संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडावी', फडणवीसांचे टीकास्त्र
ठाकरे गटाचे संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला गेले आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी म्हणाले की, वसंतदादांपासून मुंबईच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू म्हटले आहे. त्याचा विसर पडू दिला नाही. आम्ही मुंबईला धक्का लागू देणार नाही. बेळगावात येऊन एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करणे म्हणजे सीमभागाचा दावा कमी करण्याचा प्रकार आहे. असे राऊत म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, सीमाभागातील लोक दहशतीखाली आहेत. मुंबईवर सातत्याने हल्ले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, प्रकल्प पळवून नेले जात आहेत.मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव होता.मुंबई ही भांडवलदारांची बटीक करण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. भाजपचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कसलाही संबंध नाही. भाजपच्या यापूर्वीच्या नेत्यांनी सीमाभागात येऊन प्रचार केला नाही. असे राऊत म्हणाले.
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी मी इथे आलो आहे. मराठी भाषिकांच्या मागे मी पण आहे आणि भाजपासुद्धा आहे. संजय राऊत यांनी जर काँग्रेसची दलाली सोडली तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी या ठिकाणी येतायत. असे फडणवीस म्हणाले.