Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisTeam Lokshahi

उद्धव ठाकरेंच्या 'मुलाखती'नंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
Published by :
shweta walge

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची जी घरगुती मुलाखत आहे. त्या घरगुती मुलाखतीतला एकही वाक्य हे प्रतिक्रिया देन्यासारख नाही . नाही त्यामुळे कृपया माझा वेळ त्याकरता घेऊ नका.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
BRSच्या संपर्कात वंचित? उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचं काय?

पूर परिस्थिती बाबत विचारले असता ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आहे, पण आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रण आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या एन डी आर एफ ची मदत घेतली आहे. सगळ्या ठिकाणी प्रशासन योग्य वेळी पोहोचला आहे. लोकांना मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू देखील केला आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री यांनी तातडीने मदत 5 हजार वरून 10 हजार वाढवून दिली आहे. जिथे जिथे अशा प्रकारची परिस्थिती आहे त्या ठिकाणी अश्या प्रकारची मदत केली जाईल. असं ते म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com