मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा झालीय का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा झालीय का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दिल्ली दौऱ्यावरुन आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा झाली नाही. परंतु, आम्ही योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. असे त्यांनी सांगितले.

शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली आणि शाह यांनी या विस्ताराला हिरवा कंदील दाखवल्याचंही सांगितलं गेलं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर माहिती मिळाली आहे.

तसेच ते म्हणाले की, आचारसंहिता सुरु असल्यामुळे आम्हाला लिमिटेड अशी परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. आम्हाला जास्त चर्चा करता येणार नाही. बजेटच्या वेळी मराठवाड्यासाठी काय देता येईल याकडे लक्ष देऊ असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com