"या कारणासाठी काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देणं सुरू केलं”, देवेंद्र फडणवीस
Admin

"या कारणासाठी काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देणं सुरू केलं”, देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले की, “जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मोदींना शिव्या दिल्या आहेत तेव्हा तेव्हा गुजरात आणि देशाच्या जनतेने मतांच्या माध्यमातून त्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. तसेच मागच्या पेक्षा अधिक मतं देत मोदींसोबत असल्याचं सांगितलं. तसेच अशा लोकांना त्यांची लायकी दाखवली आहे. माफ करा मी लायकी हा शब्द वापरला, पण कधी कधी हा शब्द वापरावा लागतो.”असे ते म्हणाले.

यासोबतच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोदींविषयी अपशब्द काढून हे सिद्ध केलं की काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. त्यांच्याकडे मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही उत्तर नाही. त्यांच्याकडे नेताही नाही आणि नीतीही नाही. त्यामुळेच ते या भाषेपर्यंत घसरले आहेत. “जशी निवडणूक जवळ येत आहे तसे काँग्रेसला त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठं मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असं काँग्रेस नेत्यांना लक्षात येतं तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात.” असा जोरदार हल्लाबोल फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांनी प्रभू रामांच्या अस्तित्वालाच नाकारलं आणि खरंच रामाचा जन्म झाला होता का असा प्रश्न उपस्थित केला असे लोक ७०० वर्षांचा कलंक मिटवून रामललांच्या मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू केलं त्यांना रावणाची उपमा देत आहेत आणि “जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा काँग्रेसला त्यांचा पराभव खूप स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठं मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असं काँग्रेस नेत्यांना लक्षात येतं तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात.”

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com