Devendra Fadnavis : "भाषेवरून मारहाण केल्यास, सक्त कारवाई..." मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे दिल्लीतून बोलताना भाषेवरून मारहाण केल्यास, सक्त कारवाई होणार असा इशारा दिला आहे.
Published by :
Prachi Nate

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले असून तिथे जेएनयूमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार होते. मात्र फडणवीस त्याठिकाणी पोहचण्याआधीच त्यांच्या विरोधात जेएनयू कँम्पसमध्ये SFIचं आंदोलन सुरु झालं. हे आंदोलन महाराष्ट्रातील मराठी हिंदी वादावरुन आंदोलन झाल्याच सांगण्यात येत आहे.

याचपार्शवभूमीवर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मातृभाषेचा अभिमान आहे, पण इतर भाषाचा सन्मान ठेवला पाहिजे. मराठी सोबत भारतीय भाषा यायला हव्या. तामिळ भाषेचा देखील स्वाभिमान वाटला पाहिजे. मराठी माणूस कधीच संकुचित वागू शकत नाही. मराठे स्वतःकरिता लढत नव्हते, भारतीय संस्कृतीसाठी मराठे लढले. काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची एलर्जी आहे, पण काळजी करू नका. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच ओळखला जाणार आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com