Video: 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट, अखेर जामकर करणार देवमाणसामधल्या राक्षसाला अटक
Devmanus upcoming twist: ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांना सतत धक्क्यावर धक्का देत आहे. कथानक इतकं अनपेक्षित आहे की पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. सध्या मालिकेत एकामागोमाग एक गुन्हे घडताना दिसत आहेत.
गोपाळ हा त्याचा खरा चेहरा लपवून जगत असून तोच देवीसिंग उर्फ अजित आहे. तो नाव बदलून, वेगळी ओळख घेऊन लोकांना फसवतो. पैशांचा मोह आणि स्त्रियांना आपल्या बोलण्यात गुंतवणं, हेच त्याचं हत्यार आहे. तो स्वतःपुरताच विचार करणारा असून कोणत्याही नात्यात खऱ्या अर्थाने गुंतत नाही.
अडचणीत असलेल्या, आयुष्यात आनंद न मिळालेल्या स्त्रियांना तो खोटा आधार देतो. सुंदर भविष्याची स्वप्नं दाखवतो. त्याच्या बोलण्याला भुलून त्या स्त्रिया घरच्यांपासून गोष्टी लपवतात आणि घर सोडताना पैसे व दागिने घेऊन निघतात. मात्र गोपाळ त्यांचा विश्वासघात करून सर्व काही लुटतो आणि त्यांचा जीव घेतो.
आता या अंधाऱ्या वाटेवर त्याची पत्नी लालीही चालताना दिसत आहे. गोपाळसाठी ती कोणतीही हद्द ओलांडायला तयार आहे. नुकताच तिने इन्स्पेक्टर मार्तंड जामकरची बहीण आर्याचा खून केला, कारण आर्या गोपाळच्या प्रेमात अडकली होती. त्यामुळे मालिकेतील थरार अधिकच वाढला आहे.
थोडक्यात
‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांना सतत धक्क्यावर धक्का देत आहे.
कथानक इतकं अनपेक्षित आहे की पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधणं कठीण आहे.
सध्या मालिकेत एकामागोमाग गुन्हे घडताना प्रेक्षकांना दिसत आहेत.
मालिकेतील ट्विस्ट आणि सस्पेन्स प्रेक्षकांचा उत्साह वाढवत आहेत.

