CSK, IPL 2024
CSK, IPL 2024

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! 'हा' दिग्गज खेळाडू IPL मधून बाहेर, प्रमुख गोलंदाजाला मिळाली संधी

यंदाच्या आयपीएल हंगामात दिग्गज खेळाडू IPL मधून बाहेर झाल्यानं चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.
Published by :

आयपीएल २०२४ मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा प्रमुख सलामी फलंदाज डेवॉन कॉन्वे दुखापतीमुळं यंदाच्या आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर चेन्नईने रिप्लेसमेंट म्हणून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला संघात सामील केलं आहे. सीएसके फलंदाजीत चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळेच सीएसकेनं आता वेगवान गोलंदाजाच्या रुपात नव्या खेळाडूला सामील केलं आहे.

डेवॉन कॉन्वेला आयपीएलपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत दुखापत झाली होती. याच कारणामुळे त्याला सतत सामन्यांना मुकावं लागत होतं. त्याने आयपीएल २०२४ मध्ये एकही सामना खेळला नाहीय. त्याच्या जागेवर रचिन रविंद्रने कर्णधार ऋतुराज गायकवाडला सलामीला साथ दिली.

रिचर्ड ग्लीसन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज

चेन्नई सुपर किंग्जने आता रिप्लेसमेंट म्हणून रिचर्ड ग्लीसनला संघात सामील करुन घेतलं आहे. ग्लीसनने इंग्लंडसाठी ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ९ विकेट्स घेतले आहेत. त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ९० टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर १०१ विकेट्स घेण्याची नोंद झाली आहे. चेन्नईने रिचर्डला ५० लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी केलं आहे.

डेवॉन कॉन्वेनं आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने सीएसकेसाठी सलामीला फलंदाजी केली होती. मागील हंगामात कॉन्वेनं १६ सामन्यांमध्ये ६७२ धावा कुटल्या होत्या. यामध्ये नाबाद ९२ धावा हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. गतवर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने ६ अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com