पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा; धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा; धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धैर्यशील माने म्हणाले की, आज राष्ट्राचे नेते सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब स्वत: लोकांना संबोधित करण्यासाठी कोल्हापूरच्या भूमीमध्ये येत आहेत. खरतर हा सुवर्ण क्षण आहे. राष्ट्राचे सर्वोच्च नेतृत्व खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या मातीमधून ही हुंकार भरतेय. आम्हाला दोन्ही उमेदवारांना बळ देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. मोदी साहेबांची ऊंची ही आंतरराष्ट्रीय पातळीची आहे. जगभरातली जनता मोदी है तो मुमकीन है असं या ठिकाणी म्हणायला लागली आहे. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कामाचं कौतुक होतंय.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मोदी जी काय बोलतील हे आपण सांगू शकत नाही. कारण त्यांचा अभ्यास, त्यांचे विचार जगाला प्रेरित करणारे आहेत. आज भारत देशाची गाथा जगभर या ठिकाणी गायली जात आहे, भारताची जी प्रतिष्ठा जगबरामध्ये वाढलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या जो आजचा मेळावा आहे तो अत्यंत उच्चांकी म्हणजे एक ते दीड लाख लोक या ठिकाणी फक्त मोदीजींना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि त्यांच्या विचाराने मंत्रमुग्ध होण्यासाठी येतील. असे धैर्यशील माने म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com