Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikTeam Lokshahi

धनंजय महाडीक...राज्यसभेसाठी भाजपनं दिला तिसरा उमेदवार

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता कमी झाल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

मुंबई : राज्यातील सर्वच पक्षांनी सध्या राज्यसभेच्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनेही (BJP) आपले जाहीर केले आहेत. तर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मात्र शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता भाजपने अनिल बोंडे (Anil Bonde) आणि पियुष गोयल यांच्यानंतर धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांना आपला तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे आता ही निवडणुक बिनविरोध होणार नसल्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

Dhananjay Mahadik
राज्यसभेसाठी भाजपचे 2 उमेदवार जाहीर; तिसराही देणार ?

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सध्या राज्यात निवडणुक होतेय. त्यानुसार शिवसेनेने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक अशा जागांसाठी उमेदवार दिले आहेत. तर भाजपनेही दोन उमेदवारांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र त्यानंतर आता धनंजय महाडीक यांनाही पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबईत बोलावल्याची माहिती आहे.

Dhananjay Mahadik
राज्यसभेच्या जागेसाठी कॉंग्रेसची उमेदवारी घोषित; नेते नाराज

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून ते उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. परंतु, या निणर्यावर राज्यातील कॉंग्रेस जनांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक जण इच्छुक असतानाही बाहेरील नेत्याला संधी दिल्याने कॉंग्रेस नेते नाराज झाले असल्याचे समजते आहे. परंतु, कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी अल्पसंख्याकाला उमेदवारी देण्याबाबत आग्रही असल्याने ही उमेदवारी इमरान प्रतापगडी यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. तर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील नाराजी हाय कमांडसमोर मांडणार असल्याचे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com