Dhananjay Mahadik : जो भाजपाचा नारा आहे 'अबकी बार 400 पार' तो नारा यशस्वी होईल

Dhananjay Mahadik : जो भाजपाचा नारा आहे 'अबकी बार 400 पार' तो नारा यशस्वी होईल

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की, लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज संपन्न होत आहे. प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा चंग भारतातील सर्व नागरिकांनी बांधलेला आहे. तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी गेले महिनाभर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगले धैर्यशील माने यांच्यासाठी अथक प्रयत्न केलेलं आहेत.

मला विश्वास आहे आज तुम्ही पाहता आहेत मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि जो भाजपाचा नारा आहे अबकी बार 400 पार तो नारा यशस्वी होईल. असे धनंजय महाडिक म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com