Dhananjay Munde Resignation : मोठी बातमी; धनंजय मुंडे यांचा राजीनामा
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. यातच संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. या फोटोत संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली हे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 2 तास चर्चा झाली.
याच पार्श्वभूमीवर आता अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे पीए धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा सोपवला असून मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा स्विकारला आहे.