महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान ‘या’ जिल्ह्याला; स्पर्धा कधी आणि कु़ठे होणार?

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान ‘या’ जिल्ह्याला; स्पर्धा कधी आणि कु़ठे होणार?

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली आहे. यंदाच्या स्पर्धेचा मान हा धाराशिव या जिल्ह्याला मिळाला आहे. पाच दिवसांचा महाराष्ट्र केसरीचा हा थरार पाहायला मिळणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या पैलवानाला चांदीची मानाची गदा व 30 लाख रुपये किमतीची स्कर्पिओ गाडी मिळणार आहे. द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर असल्याची माहिती मिळत आहे.

31 जूनला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत मानाच्या स्पर्धेचं आयोजन हे धाराविव जिल्ह्यात करावं अशी मागणी करण्यात आली होती. धाराशिवमधील तुळजाभवानी स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. सर्व जिल्ह्यांमधून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू गादी गटात असे 900 खेळाडू सहभागी होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com