Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक' पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "धारावीची खरी ओळख म्हणजे इथला कुशल श्रमशक्तीवर आधारित अर्थव्यवस्थेचा अनोखा चेहरा. लाखो कारागीर, लघुउद्योग, वंचित घटक यांचा जीव की प्राण असलेल्या या भागाचा आत्मा कायम राखतच पुनर्विकास व्हावा, हे प्राधान्याने अधोरेखित करण्यात आले." तसेच, "धारावी हा देशाचा आर्थिक नकाशा बदलणारा पट्टा आहे. त्यामुळे येथील पुनर्विकास पर्यावरणस्नेही, सर्वसमावेशक आणि संवेदनशील पद्धतीने व्हावा. प्रत्येक धारावीकराला या प्रकल्पात सामावून घेण्याची जबाबदारी प्रशासनाने नाकारू नये, यावर भर देण्यात आला," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.