धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आज मुंबईमध्ये कार्यक्रम
Admin

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आज मुंबईमध्ये कार्यक्रम

'बागेश्वर धाम सरकार' म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईत कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.

'बागेश्वर धाम सरकार' म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईत कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारीही आयोजकांकडून करण्यात आली आहे. आज पहाटे चार वाजता त्यांचं मुंबईत आगमन झालं. मीरा रोड परिसरात 18 आणि 19 मार्च दोन दिवस धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. दुसरीकडे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं. या कार्यक्रमात जवळपास 50 हजार ते एक लाखापर्यंत भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मिरा रोडच्या एस. के. स्टोन ग्राउंड येथे बागेश्र्वर धीरेंद्र शास्त्री यांचे दोन दिवसीय कार्यक्रम पार पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com