धोनी पुन्हा बनला CSK चा कर्णधार; ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर

धोनी पुन्हा बनला CSK चा कर्णधार; ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर

दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून बाहेर. उर्वरित सामन्यांसाठी एम एस धोनी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल
Published by :
Rashmi Mane
Published on

आयपीएल स्पर्धेचा हंगाम अर्ध्यावर आला असताना चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार पदाची धुरा पुन्हा एकदा एम एस धोनीकडे आली आहे. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला असून उर्वरित सामन्यांसाठी एम एस धोनी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल, अशी माहिती सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची दिली आहे.

सध्या आयपीएलचे सामने सुरू असून आतापर्यंत सीएसकेचे पाच सामने झाले आहेत. मात्र पहिला सामना जिंकल्यानंतर उर्वरित सर्व सामने सीएसकेने गमावले आहेत. त्यामुळे आता धोनीकडे पुन्हा एकदा कर्णधार पद आल्याने सीएसके विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. आयपीएलचे सामने सुरू झाल्यापासून धोनीकडे सीएसकेचे कर्णधार पद होते. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने अनेकदा आयपीएल स्पर्धा जिंकल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com