Smriti mandhana wedding : लग्नस्थळीच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? केआरकेच्या नव्या दाव्याने खळबळ
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या लग्नाला काही तास आधीच मोठा धक्का बसला आणि तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी होणारा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, लग्न पुढे गेले तरी त्याच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या अफवांचा आणि व्हायरल चॅटिंगचा गदारोळ अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच बॉलिवूडचा वादग्रस्त अभिनेता केआरके (कमाल आर. खान) याने केलेल्या नव्या दाव्याने प्रकरणाला नवा वळण मिळाले आहे.
व्हायरल चॅटिंगने पेटले वादाचे लोण
स्मृती मानधनाने लग्न पुढे ढकलल्यानंतर तिच्या इन्स्टाग्रामवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो-वीडिओ हटवले. यानंतर सोशल मीडियावर काही कथित स्क्रीनशॉट व्हायरल झाले. या स्क्रीनशॉटमध्ये पलाश मुच्छल एका तरुणी मेरी डि'कोस्टा हिच्याशी चॅटिंग करत असल्याचा दावा करण्यात आला. स्क्रीनशॉटमध्ये पलाश म्हणे त्या तरुणीला भेटायलाही बोलवत असल्याचे दिसून आले. याच कारणावरून – स्मृतीला फसवले, पलाशने विश्वासघात केला, अशी चर्चा जोर धरू लागली. मात्र या स्क्रीनशॉटचे सत्य अद्यापही सिद्ध झालेले नाही.
केआरकेचा खळबळजनक दावा : “लग्नातच रंगेहाथ पकडला!”
वादग्रस्त विधानांसाठी कुप्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.त्याने आपल्या सोशल मीडियावर दावा केला आहे की – “लग्नाचा कार्यक्रम सुरु असतानाच स्मृती मानधनाने पलाशला एका कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडले.” यासोबतच केआरकेचे आणखी एक विधान धक्कादायक ठरले “पलाशला स्मृतीशी फक्त प्रसिद्धीसाठी लग्न करायचे होते.” केआरकेने यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींबाबत वादग्रस्त बोलून चर्चेत राहिले असल्याने लोक या दाव्यांकडे शंकेनजरेने पाहत आहेत. तरीही या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चा पेटली आहे.
पलाशची प्रतिक्रिया नाही; स्मृती शांत या संपूर्ण प्रकरणावर पलाश मुच्छलकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. स्मृती मानधनाही सध्या आपल्या वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देत असून तिने कोणतेही विधान केलेले नाही.
यामुळं प्रश्न कायम आहेत
चॅटिंगचे स्क्रीनशॉट खरे आहेत का?
केआरकेचा दावा तथ्याधारित आहे का?
पलाश-स्मृतीचे लग्न आता कधी होणार?
या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सध्या धूसर आहेत.
येत्या काळात प्रकरण कोणता वळण घेणार?
स्मृती-पलाश विवाहसोहळा पुढे ढकलला गेल्यानंतर, कथित चॅटिंग, विश्वासघाताचे आरोप आणि केआरकेचे दावे या सगळ्यामुळे प्रकरण अधिकच गडद बनले आहे. आता पलाशची बाजू काय आहे आणि स्मृतीचा निर्णय कोणता असेल,हेच पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्राचे लक्ष या जोडप्यावर खिळले आहे.
