एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवण्याची किंमत गुजरात सरकारने वसूल केली का ? - महेश तपासे यांचा सवाल

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवण्याची किंमत गुजरात सरकारने वसूल केली का ? - महेश तपासे यांचा सवाल

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला त्यावरून राज्यात शिंदे फडणवीस सरकार व महविकास आघाडी मध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे.

अमजद खान, कल्याण

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला त्यावरून राज्यात शिंदे फडणवीस सरकार व महविकास आघाडी मध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे .याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी वेदांता फॉक्स कॉन ही कंपनी गुजरातला हलवली म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची किंमत गुजरात सरकारने वसूल केली का? असा सवाल उपस्थित केलाय.

याबाबत बोलताना तपासे यांनी महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार असताना तळेगाव येथे या कंपनीला जागा देण्याचे निश्चित झालं .साधारण दोन लक्ष कोटी या ठिकाणी गुंतवणूक होणार होटी या गुंतवणुकीच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळनार होता हजारो कोटींचा जीएसटीच्या माध्यमातून महसूल महाराष्ट्र सरकारला मिळाला असता ,मात्र दोन महिन्यांमध्ये नाट्यमय घडामोडी झाल्या.

सरकार बदललं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यांच्या दौरा सुरू करत असताना त्यांचा बंड कसा योग्य आहे यावरच त्यांनी भाष्य केलं , महाराष्ट्राच्या आधुनिकरण औद्योगीकरण रोजगाराच्या गोष्टीवर कुठलच भाष्य केलं नाही असा टोला लगावला .

Lokshahi
www.lokshahi.com