Difference Between Ganesh Jayanti And Ganesh Chaturthi
Difference Between Ganesh Jayanti And Ganesh Chaturthi

Ganesh Jayanti 2026 : एक बाप्पा, दोन उत्सव! गणेशचतुर्थी आणि गणेश जयंतीमागचं रहस्य काय? जाणून घ्या...

आज माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा दिवस गणरायाच्या जन्माशी जोडलेला असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या या उत्सवामुळे याला माघी गणेशोत्सव असे म्हटले जाते.
Published by :
Riddhi Vanne
Published on

आज माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा दिवस गणरायाच्या जन्माशी जोडलेला असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या या उत्सवामुळे याला माघी गणेशोत्सव असे म्हटले जाते. पुराणकथेनुसार, माता पार्वतीने या दिवशी आपल्या देहापासून गणपतीची निर्मिती केली. म्हणूनच हा दिवस बाप्पाची जयंती मानला जातो.

माघी गणेशोत्सवाला गणपती घरी आणण्याची परंपरा आहे. मात्र हा उत्सव भाद्रपदातील गणेश चतुर्थीपेक्षा वेगळा आहे. गणेश चतुर्थी म्हणजे उत्साह, मिरवणुका आणि मोठा आनंदोत्सव; तर माघी गणेशोत्सव शांत, भक्तीमय आणि ध्यानधारणा करणारा सण आहे. या काळात पूजा, उपासना आणि साधनेला अधिक महत्त्व दिले जाते.

माघी गणेशोत्सव अल्पकाळाचा असला तरी त्यात श्रद्धा आणि अध्यात्म यांचा गहिरा भाव असतो. तर भाद्रपदात गणराय भक्तांच्या घरी पाहुणा म्हणून येतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. कोकणात तर बाप्पा गौरीच्या आगमनापूर्वी माहेरी आलेला पाहुणा मानला जातो. लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीला सार्वजनिक स्वरूप दिले आणि तो उत्सव आज मुंबईची ओळख बनला. मात्र माघी गणेशोत्सव आजही भक्ती, श्रद्धा आणि शांततेचा सण म्हणून साजरा केला जातो.

थोडक्यात

• आज माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.
• हा दिवस गणरायाच्या जन्माशी जोडलेला असल्याने विशेष महत्त्व.
• माघ महिन्यात येणारा उत्सव म्हणून याला माघी गणेशोत्सव म्हटले जाते.
• पुराणकथेनुसार माता पार्वतीने या दिवशी गणपतीची निर्मिती केली.
• त्यामुळे हा दिवस गणपती बाप्पाची जयंती मानली जाते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com