Washim Hospital: वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगावच्या ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था

Washim Hospital: वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगावच्या ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगावच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत शिकस्त झाली आहे.
Published by :
Sakshi Patil

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगावच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत शिकस्त झाली आहे.

ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे. या इमारतीच्या स्लॅबमधील खडी व वाळू वारंवार गळून पडत असून, अनेक ठिकाणी प्लास्टर निघाल्याने बांधकामातल्या सळ्या बाहेर दिसू लागल्या आहेत.

त्यामुळे हा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज येणाऱ्या रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी व काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचा जीवही धोक्यात आलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com