Teacher Recruitment Scam : नागपूरमधील बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस; संस्थाचालक अध्यक्ष दिलीप धोटे अटकेत

नागपूर जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश झाला असून, यामध्ये संस्थाचालक दिलीप धोटे यांच्या अटकेने खळबळ उडाली आहे.
Published by :
Team Lokshahi

नागपूर जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश झाला असून, यामध्ये संस्थाचालक दिलीप धोटे यांच्या अटकेने खळबळ उडाली आहे. कळमेश्वर तालुक्यातील मोहपाक येथील धोटे यांनी प्रत्येक बोगस शिक्षक भरतीसाठी 15 लाख रुपये घेतल्याचा संशय राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला आहे. या प्रकरणाचा तपास विठ्ठल-रुक्मिणी बहुशिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. भरती प्रक्रियेत फसवणूक झाल्याचे आणि उमेदवारांकडून भरमसाठ रक्कम घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक म्हणून नेमणुका करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

शिक्षक भरतीसाठी कोट्यवधींचा व्यवहार

प्रत्येक उमेदवाराकडून 16 लाख रुपये उकळले गेल्याची प्राथमिक माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. यामध्ये सुमारे 20 ते 30 शिक्षकांच्या भरतीचा संशय असून, एकूण व्यवहार कोट्यवधींमध्ये पोहोचल्याची शक्यता आहे.

आयटी सेलचा संशय आणि आर्थिक चौकशी

धोटे यांच्याकडे आलेल्या रकमेचा मागोवा घेतला जात आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर एसआयटीने बारीक लक्ष ठेवले असून, चलन व्यवहार, बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आढळून आलेली रोकड आणि बोगस कागदपत्रे तपासात महत्त्वाची ठरत आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, वेतन अधीक्षक निलेश वाघमारे याने या प्रकरणातील बनावट आयडी तयार केल्याचे उघड झाले आहे. "बोगस शिक्षक भरती प्रकरणात आणखी मोठे नाव समोर येण्याची शक्यता आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. काही उमेदवारांची आयडी सुद्धा बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा

Teacher Recruitment Scam : नागपूरमधील बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस; संस्थाचालक अध्यक्ष दिलीप धोटे अटकेत
NEET UG Result 2025 : पहिल्याच प्रयत्नात कृष्णांग जोशीने पटकावली भारतात तिसरी रँक; सर्वत्र होतयं कौतुक
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com