पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण; लोकशाही मराठीच्या दोन प्रतिनिधींचा सन्मान

पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण; लोकशाही मराठीच्या दोन प्रतिनिधींचा सन्मान

लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे आणि सुरेश वायभट यांना पुरस्कार प्रदान.
Published by :
Sagar Pradhan

छत्रपती संभाजी नगर येथे ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक मराठवाडा साथीचा पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दि .७ एप्रिल रोजी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आणि पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, संयोजक मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, जगदीश बियाणी यांच्या उपस्थितीत झाले.

यामध्ये लोकशाही मराठीच्या दोन प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आलाआहे. यामध्ये छत्रपती संभाजी येथील लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी सचिन बडे यांना पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सचिन बडे यांना सन्मानचिन्ह देऊन कार्याचा सन्मान करत पत्रकारितेत केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आलाय. तर दुसरे प्रतिनिधी सुरेश वायभट यांचा विभागीय पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी यांचे जीवन व पत्रकारिता आदर्श असुन मराठवाड्याच्या विकासात त्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पत्रकार प्रबोधिनी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देऊ,असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.तर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे बैठक लावुन पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.तर पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा दिला तर शासनावर प्रभाव पडेल, छोटी वृत्तपत्र सामान्य माणसाचा आवाज आहेत त्यासाठी ती अर्थीक पातळीवर सक्षम झाली पाहिजेत यासाठी उत्पादन खर्चावर आधारित विक्री किंमत असे धोरण स्विकारावे लागेल. शासनाने ही वृत्तपत्रांना अधिकची मदत करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन वसंत मुंडे यांनी केले.तर पत्रकारांसाठी स्वतंत्र अर्थीक विकास महामंडळ असावे असे मत प्रमोद डोईफोडे यांनी व्यक्त केले.

प्रस्तावीक डॉ. प्रभू गोरे तर सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले. पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने दैनिक सकाळ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक दयानंद माने, मुुंबईतील दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी चंदन शिरवाळे, दैनिक लोकमतचे सहायक संपादक पवन देशपांडे, युनिसेफ महाराष्ट्रचे राज्य सल्लागार तानाजी पाटील तर ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्काराने तर दैनिक आनंद नगरीचे संस्थापक संपादक शिवरतन मुंदडा व ‘कार्यगौरव’ पुरस्काने छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील,महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड आदींना सन्मानित करण्यात आले.

विभागीय पुरस्कार प्राप्त पत्रकार

मराठवाडा विभाग : बाबा देशमाने (दै. रिपाेर्ताज, संपादक, बीड),चंद्रकांत तारू (दै. सकाळ, पैठण तालुका प्रतिनिधी), सचिन बडे (लोकशाही न्यूज चॅनल, छत्रपती संभाजीनगर ), प्रा.डॉ. विठ्‌ठल जायभाये (मुक्त पत्रकार, परभणी), आनंद इंदानी (दै. सकाळ, बदनापूर तालुका प्रतिनिधी), सचिन कोरडे (दै. आधुनिक केसरी, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी), संग्राम वाघमारे (दै. पुढारी, चालकूर तालुका प्रतिनिधी), गोकुळसिंग राजपूत (दै. आनंद नगरी, सोयगाव तालुका प्रतिनिधी), शकील खलिफा (दै. देशोन्नती, पैठण तालुका प्रतिनिधी), गोकुळ लांडे (दै. मराठवाडा साथी, गंगापूर प्रतिनिधी), संदीप मानकर (दै. आधुनिक केसरी, सिल्लोड तालुका प्रतिनिधी), सुरेश वायभट (पैठण तालुका प्रतिनिधी), प्रा. बिभीषण चाटे, (दै. संकेत, बीड), प्रा. बाळासाहेब बोराडे (दै. आधुनिक केसरी, जालना जिल्हा प्रतिनिधी)

विदर्भ विभाग : प्रमोद पाणबुडे (दै. साहसिक, वर्धा), एकनाथ चौधरी (दै. महाराष्ट्र टाईम्स, वर्धा प्रतिनिधी)

नाशिक विभाग : किरणकुमार आवारे (दै. लोकनामा, निफाड तालुका प्रतिनिधी), बंडू खडांगळे (दै. आधुनिक केसरी, दिंडोरी तालुका प्रतिनिधी), मनोहर बोचरे (दै. सकाळ, देवगाव प्रतिनिधी)

पश्चिम महाराष्ट्र विभाग : श्रीकांत चौरे (दै. मराठवाडा साथी, पारनेर तालुका प्रतिनिधी), नवनाथ खिल्लारे (दै. नवराष्ट्र, पंढरपूर प्रतिनिधी), अशोक सूर्यवंशी (दै. मराठवाडा साथी, मिरजगाव प्रतिनिधी), नरहरी शहाणे (दै. मराठवाडा साथी, पाथ्रडी तालुका प्रतिनिधी), अजय नजन (दै. मराठवाडा साथी, शेवगाव तालुका प्रतिनिधी), किसन पवार (दै. मराठवाडा साथी, कोपरगाव तालुका प्रतिनिधी)

कोकण विभाग : सचिन दामोदर कांबळे (टाईम्स् नाऊ न्यूज चॅनल, रत्नागिरी), विनोद पवार (दै. पुढारी, मंडणगड प्रतिनिधी),

अमरावती विभाग : गुलाबराव इंगळे (दै. सकाळ, जळगाव जामोद, तालुका प्रतिनिधी), सागर झनके (दै. आधुनिक केसरी, जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी), अमोल गावंडे (दै. निर्भीड स्वराज संपादक, खामगाव), किरण डोंगरदिवे (मुक्त पत्रकार) आदींना सन्मानित करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com