ताज्या बातम्या
CM Fadnavis On Flood : 'पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार कोटींचे वाटप सुरु' फडणवीस यांची माहिती
पूरग्रस्त निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने तोडका काढला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अतिदृष्टीमुळे राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरीसह सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालेला आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीने पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी करत आहेत.
पूरग्रस्त निर्माण झालेल्या परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. याचपार्श्वभूमिवर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार कोटींचे वाटप सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
घरात पाणी भरलेल्यांना 10 हजार देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचसोबत रेशनकिट देखील देण्यास सुरुवात झाली आहे. अधिकाधिक मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे. सरसकट पंचनाने देण्याचे आदेश ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.