WhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे?
आज मोबाईलशिवाय दिवस जात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन दिसतो आणि त्यात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ॲप म्हणजे WhatsApp. पण आता याच WhatsApp बाबत एक धक्कादायक बदल समोर येतोय.
लवकरच WhatsApp पूर्णपणे मोफत राहणार नाही, अशी शक्यता आहे. कंपनी जाहिरातमुक्त वापरासाठी पैसे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच, फ्री वापरायचं असेल तर जाहिराती पाहाव्या लागतील आणि जाहिराती नको असतील तर खिशाला कात्री लागणार!
नवीन अपडेटच्या कोडमधून असं दिसून येतं की स्टेटस आणि चॅनेलमधील जाहिराती काढून टाकण्यासाठी वेगळं पेड प्लॅन असू शकतं. मेटाकडून यावर अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी ही योजना लवकरच येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पैसे भरल्यावर वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त WhatsApp अनुभव मिळेल. मात्र यासाठी किती शुल्क द्यावं लागेल, कोणते अतिरिक्त फायदे मिळतील किंवा ही सुविधा कधी सुरू होईल, याबाबत अजून माहिती नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे – WhatsApp वापरण्याचा अनुभव आता दोन प्रकारचा असू शकतो.
थोडक्यात
आजच्या काळात मोबाईलशिवाय दिवस जाणं अशक्य
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन
स्मार्टफोनवर सर्वाधिक वापरलं जाणारं ॲप म्हणजे WhatsApp
दैनंदिन संवादासाठी WhatsApp वर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व
मात्र आता WhatsApp संदर्भात एक धक्कादायक बदल समोर येत आहे
या बदलाचा परिणाम लाखो वापरकर्त्यांवर होण्याची शक्यता

