डॉक्टरांच्या टिचकीने दिले बाळाला जीवनदान; नंदुरबारमध्ये घडला चमत्कार
राज्यातील नंदुरबार येथे एक चमत्कारिक घटना घटली आहे. दोन महिन्याचे मूल अधिक प्रमाणात आजारी असल्याने एकदम निपचित पडून होते. ते काहीही हालचाल करत नव्हते त्यामुळे 2 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला असे समजून कुटुंबीयांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली. या सगळ्यामध्ये कुटुंबीयांनी बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारीदेखील सुरु केली. मात्र त्यानंतर जो प्रकार घडला त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले.
बाळाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांना ही माहिती कळताच त्यांनी स्वतः जाऊन बाळाची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या पायाला छोटीशी टिचकी मारली. पायावर टिचकी मारताच बाळाने श्वासोच्छवास घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉक्टरांसह बाळाच्या कुटुंबियांच्या जीवात जीव आला.
बाळाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव येथे राहणाऱ्या मिनाबाई सचिन पावरा होळीनिमित्त तेलखेडी येथे आली होती. दोन महिन्याचं बाळ दूध पित नव्हतं आणि ते काहीच हालचालदेखील करत नव्हतं. यामुळे कुटुंबीय घाबरले. त्यांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे समजून आक्रोश सुरु केला. कुटुंबातील काही व्यक्तींनी डॉ. गणेश तडवींना संपर्क साधला.
डॉक्टरांनी तिथे येऊन बाळाची तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या पायाला टिचकी मारली. बाल श्वास घेऊ लागल्याने सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आले. दरम्यान आता बळावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांत बाळाला डिस्चार्ज मिळणार आहे.