dombivali viral girl shawarma vendor interacts journalist police lathicharges crowd video goes viral kdmc feriwale
dombivali viral girl shawarma vendor interacts journalist police lathicharges crowd video goes viral kdmc feriwale

KDMC : माइकसमोर तरुणी, मागे लाठीचार्ज! डोंबिवलीतील प्रकाराने खळबळ, सोशल मीडियावर Video Viral

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका मराठी तरुणीचा साधा पण धाडसी संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शॉरमा विकून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका मराठी तरुणीचा साधा पण धाडसी संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शॉरमा विकून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आणि स्थानिक नेत्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तरुणीची भेट घेऊन तिची बाजू ऐकून घेतली आणि व्यवसायासाठी मदतीचा शब्द दिला. त्यानंतर तिच्या स्टॉलजवळ नागरिक आणि माध्यमांची मोठी गर्दी जमली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी जमाव हटवला, यावेळी काही काळ तणावही निर्माण झाला.

या तरुणीचा आरोप आहे की, महापालिकेची कारवाई फक्त तिच्यावरच होत होती, तर इतर फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. तिने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडल्यानंतर हा विषय चांगलाच पेटला. मनसेने मराठी व्यावसायिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्याने परिसरात राजकीय हालचाली वाढल्या.

दरम्यान, शिवसेनेकडूनही या तरुणीला पाठिंबा मिळाला असून, अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा स्थानिक आमदारांनी दिला आहे. एका छोट्या स्टॉलपासून सुरू झालेली ही लढाई आता मराठी अस्मिता, रोजगार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

थोडक्यात

  1. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतील एका मराठी तरुणीचा संघर्ष चर्चेत

  2. शॉरमा विकून स्वतःचा उदरनिर्वाह करणारी तरुणी

  3. तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

  4. साधा पण धाडसी संघर्ष म्हणून प्रकरणाकडे पाहिले जात आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com