ताज्या बातम्या
Donald Trump Arrested : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
ट्रम्प यांच्यावर जॉर्जिया येथे निवडणूक निकाल बदलण्यासाठी फसवणूक, धमकी देणे आणि बनावटगिरी केल्याचा आरोप आहे. त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी १८ जणांना आरोपी करण्यात आले आहे.माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वर्षातील चौथ्यांदा अटक करण्यात आली.
वीस मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार ट्रम्प यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने जाणीवपूर्वक निवडणूकांचे निकाल स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला होता.