American tariffs : : डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक महत्त्वाचं विधान
American tariffs : : डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक महत्त्वाचं विधान, भारतावर होणार'हा' मोठा परिणामAmerican tariffs : : डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक महत्त्वाचं विधान, भारतावर होणार 'हा' मोठा परिणाम

American tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक महत्त्वाचं विधान, भारतावर होणार 'हा' मोठा परिणाम

ट्रम्प निर्णय: भारतावर कडक निर्बंध, एच-वन बी व्हिसा शुल्क वाढ.
Published by :
Riddhi Vanne
Published on

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव आणण्यासाठी नवनवीन निर्णय घेत आहेत. या निर्णयांचा एक भाग म्हणून त्यांनी भारताविरोधात काही कडक निर्बंध लागू केले आहेत. ताज्या घडामोडींमध्ये ट्रम्प यांनी एच-वन बी व्हिसासाठी शुल्क लक्षणीयरीत्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 21 सप्टेंबरपासून एच-वन बी व्हिसासाठी शुल्क आता एक लाख डॉलर (जवळपास 88 लाख रुपये) असणार आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतीय व्हिसाधारकांवर होईल, कारण अमेरिकेत काम करणाऱ्यांमध्ये सुमारे 70 टक्के भारतीय नागरिकांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला आहे. अमेरिकेत काम करणारे अनेक भारतीय कर्मचारी, जे सध्या भारतात होते, त्यांना आता पुन्हा अमेरिकेतील आपले काम सुरू ठेवण्यासाठी प्रवास करावा लागेल. त्यामुळे अनेक भारतीयांनी आपले दौरे अर्धवट सोडून विमानतळावरून अमेरिकेची परतफेड केली आहे.

तसेच, भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या तिकिटांची किमत देखील उचलली आहे. दिल्ली ते न्यूयॉर्क यातील तिकिटांचे दर काही तासांमध्ये 37,000 रुपयांवरून थेट 70,000 ते 80,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. तिकिटांच्या दरामध्ये झालेली या वाढीमुळे काही भारतीय नागरिकांनी अमेरिकेला जाण्याचे आपल्या योजना रद्द केल्या आहेत आणि त्याऐवजी भारतातच सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

याचदरम्यान, अमेरिका स्थित आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक संदेश आहे. अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि जेपी मॉर्गन यांसारख्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेला न सोडण्याचा सल्ला दिला आहे. ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनुसार, 21 सप्टेंबरपूर्वी अमेरिका सोडणाऱ्यांना अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड न भरण्याची सूट दिली गेली आहे. मात्र, 21 सप्टेंबरनंतर एच-वन बी व्हिसाच्या शुल्काच्या रक्कमेचा आकार एक लाख डॉलर होईल आणि त्यासाठीच अमेरिकेची प्रवेश परवानी मिळवता येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com