Gulabrao Patil : "दुस-याची पोरं आपली सांगू नये..." गुलाबराव पाटलांचा अजित दादांना टोला

गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर टीका केली आहे. नाशिकमधील सभेत ते म्हणाले की, "अजित पवारांच्या वक्तव्यानुसार, 'निवडणुकीत मत दिलं नाही तर विकासासाठी निधी मिळणार नाही', हे चुकीचं आहे. हा विकासाचा मुद्दा नसून फक्त सत्ता मिळवण्याचा प्रश्न आहे.
Published by :
Riddhi Vanne

Gulabrao Patil On Ajit Pawar : गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर टीका केली आहे. नाशिकमधील सभेत ते म्हणाले की, "अजित पवारांच्या वक्तव्यानुसार, 'निवडणुकीत मत दिलं नाही तर विकासासाठी निधी मिळणार नाही', हे चुकीचं आहे. हा विकासाचा मुद्दा नसून फक्त सत्ता मिळवण्याचा प्रश्न आहे." शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांचा खरात टोला घेत, शिंदे सरकारच्या कामाची प्रशंसा केली.

गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना चिमटा घेत, "तुम्ही दुसऱ्याचं काम तुमचं म्हणून दाखवत आहात. नगरविकास खाते आता आमचं आहे," असं सांगितलं. ते म्हणाले की, "पाणीपुरवठा योजना आम्ही आणली, नगरविकास कार्ये आम्ही केली. आम्ही सर्व समाजासाठी काम केले आहे."

पाटील यांनी अजित पवारांना शहाणपणाचे सल्ले दिले, तसेच आगामी निवडणुकीत लक्ष्मीचे आगमन होईल, असा इशाराही दिला. त्यांना हे देखील सांगितले की, "गेल्या निवडणुकीत लक्ष्मी घराघरात फिरली होती, यावेळीही ती पुन्हा येईल." गुलाबराव पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com