Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला करु नका 'या' चुका

Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला करु नका 'या' चुका

धनत्रयोदशीने (Dhanteras 2025) दिवाळीच्या सणांची सुरुवात होते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. यंदा धनत्रयोदशी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी आहे. त्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये झाडू मारु नये

  • धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दरवाजा बंद करु नका

  • धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी मिठाचे दान करु नका

धनत्रयोदशीने दिवाळीच्या सणांची सुरुवात होते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. यंदा धनत्रयोदशी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी आहे. त्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. या दिवशी देवी लक्ष्मी आणि धनाची देवता भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी नवीन भांडी, झाडू, गणपती आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. दरम्यान धनत्रयोदशीच्या दिवशी काही चुका झाल्यास समस्या उद्भवू शकतात. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या चुका करु नये जाणून घ्या

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये झाडू मारु नये

धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु संध्याकाळी घरात झाडू मारणे टाळावे. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. असे मानले जाते की या दिवशी संध्याकाळी घरात झाडू मारल्याने घरात दुःख आणि दारिद्र्य येते. म्हणून, चुकूनही धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घर झाडू नये. म्हणून या दिवशी सकाळी घर स्वच्छ करा. विशेषतः, या दिवशी तुमच्या दारावर कोणतीही घाण राहू देऊ नका.

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दरवाजा बंद करु नका

धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर येते आणि सौभाग्याचा आशीर्वाद देते. या दिवशी दरवाजा बंद ठेवू नका. यावेळी देवी लक्ष्मीचे घरामध्ये आगमन होते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते.

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी मिठाचे दान करु नका

धनत्रयोदशीला दान देणे शुभ मानले जाते. दरम्यान, संध्याकाळी एखाद्याला काहीतरी देणे अशुभ ठरू शकते. या दिवशी संध्याकाळी मीठ किंवा साखर दान करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि ती घराबाहेर पडते. शिवाय, संध्याकाळी मीठ दान केल्याने राहूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे कुटुंबात आर्थिक अस्थिरता आणि मानसिक ताण येऊ शकतो.

धनत्रयोदशीला संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नये

धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी पैसे उधार दिल्यास कुटुंबाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून धनत्रयोदशीला पैसे उधार देणे टाळावे. या दिवशी पैसे उधार दिल्याने घरातील लक्ष्मी आणि कुबेराचे मिळत नाही, अशी मान्यता आहे. असे केल्याने आर्थिक नुकसान होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com