Pune Crime
Pune Crime

Pune Crime : पुण्याच्या दापोडीत दुहेरी हत्याकांड, आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

दापोडीत दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ; आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
Published by :
Pankaj Prabhakar Rane

पिंपरी-चिंचवड : पुण्याच्या दापोडीत दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pune Crime
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांसह इतरावर दंगलीचे गुन्हे दाखल, बुलडाण्यातील शेतकरी आंदोलन चिघळल्याप्रकरणी कारवाई

शंकर नारायण काटे (वय- 60) आणि संगीता काटे (वय- 55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. प्रमोद मगरुडकर (वय- 47) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. अद्याप दुहेरी हत्येचे कारण समजू शकेलेले नाही. दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते.

तेव्हा, आरोपी प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता समोर आली आहे. आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर दिसला. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com