ISRO Scientist Eknath Chitnis : अवकाश क्षेत्रात मोठी पोकळी;
ISRO Scientist Eknath Chitnis : अवकाश क्षेत्रात मोठी पोकळी; SITE प्रयोगाचे जनक डॉ. चिटणीस यांचे पुण्यात निधन ISRO Scientist Eknath Chitnis : अवकाश क्षेत्रात मोठी पोकळी; SITE प्रयोगाचे जनक डॉ. चिटणीस यांचे पुण्यात निधन

ISRO Scientist Eknath Chitnis : अवकाश क्षेत्रात मोठी पोकळी; SITE प्रयोगाचे जनक डॉ. चिटणीस यांचे पुण्यात निधन

भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि इस्रोच्या स्थापनेतील महत्त्वाचे शिल्पकार डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे बुधवारी (22 ऑक्टोबर 2025) पुण्यात निधन झाले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि इस्रोच्या स्थापनेतील महत्त्वाचे शिल्पकार डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे बुधवारी (22 ऑक्टोबर 2025) पुण्यात निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या डॉ. चिटणीस यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. चिटणीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात PRL मध्ये कॉस्मिक किरणांवर संशोधन करून केली आणि पुढे अमेरिकेतील MIT येथे प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण घेतले. 1961 मध्ये डॉ. विक्रम साराभाईंच्या विनंतीवरून ते भारतात परतले आणि देशातील पहिलं उपग्रह टेलिमेट्री स्टेशन उभारलं. त्यांनी थुंबा (केरळ) येथे भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपण केंद्राची जागा निश्चित केली. याच ठिकाणी 1963 मध्ये Nike Apache रॉकेट प्रक्षेपित झाले, ज्याने भारताच्या अंतराळ प्रवासाची पहिली पायरी गाठली. पुढे त्यांनी श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्राची निवड करून भारताच्या अवकाश मोहिमेचा पुढील पाया रचला.

त्यांचे सर्वात ऐतिहासिक योगदान म्हणजे 1975-76 मधील Satellite Instructional Television Experiment (SITE). या प्रयोगाद्वारे नासाच्या ATS-6 उपग्रहाच्या साहाय्याने 6 राज्यांतील 2400 गावांपर्यंत शिक्षण आणि आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्यात आली. ग्रामीण भारतात तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पोहोचवण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला.

डॉ. चिटणीस यांनी तरुण वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निवडीमध्येही मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 1985 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या निधनाने भारताच्या अंतराळ इतिहासातील एक सुवर्णयुग संपले आहे. विक्रम साराभाईंच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि विज्ञानाला मानवतेची जोड देणारा एक तेजस्वी तारा आज अस्ताला गेला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com