डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारावेळी त्यांचे निधन झालं.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. मनमोहन सिंग यांची मुलगी काल रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचली आहे.
आज मुंबईच्या काँग्रेस प्रदेश कार्यालयात श्रद्धांजली अर्पण केली जाणार असून दुपारी 1 वाजता टिळक भवन, दादर येथे ही आदरांजली वाहिली जाणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.