प्रातिनिधीक फोटो
(प्रातिनिधीक फोटो) कोणत्याही अंमली पदार्थाच्या सेवनाचे समर्थन करत नाही.

धक्कादायक! किराणा दुकानात गांजा आणि दारूची विक्री

नवी मुंबईतील एका किराणा मालाच्या दुकानात गांजा आणि देशी, विदेशी दारूची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या दुकानावर धाड टाकून सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.
Published on

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका किराणा मालाच्या दुकानात गांजा आणि देशी, विदेशी दारूची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या दुकानावर धाड टाकून सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

रबाळे एमआयडीसी परिसरातील एका किराणा दुकानात गांजा आणि दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दुकानावर धाड टाकून जवळपास 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये 2 किलो तीनशे ग्राम गांजा, देशी, विदेशी दारू आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.

संपूर्ण कुटुंबच गांजा आणि दारूची विक्री करत असल्याचे दिसून आले. यामध्ये पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याघटनेतील 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com