रत्नागिरी मध्ये घडला 'ड्रंक अँड ड्राईव्ह' चा प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याने उडवल्या तब्बल आठ गाड्या

रत्नागिरी मध्ये घडला 'ड्रंक अँड ड्राईव्ह' चा प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याने उडवल्या तब्बल आठ गाड्या

 शहराजवळील कुंवारबाव येथे हे घडले थरार नाट्य घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

शहराजवळील कुंवारबाव येथे हे घडले थरार नाट्य घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती या बाबत सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार  रत्नागिरीत  शहराजवळील कुंवारबाव येथे  घडला थरार प्रसंग घडला आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या असलेल्या एका सातपुते नामक पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान या गावात ठोकर झाल्यानंतर या प्रकरणाची तक्रार कोणी केलेली नव्हती मात्र जिल्हा पोलिसांकडून दखल घेत या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा असे प्रकार घडू नयेत अशी वॉर्निंग जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी अलीकडे दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे. तर एक कर्मचारी व्यसनमुक्ती केंद्र मध्ये सध्या उपचार घेत आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर  ते या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊन आहेत. त्यामुळे आता जिल्हापोलीस अधीक्षक यांच्या बद्दल असलेला आदर अधिक वाढला आहे.

ड्रंक अँड ड्राइव करण्याचाच हा प्रकार होता हे आता स्पष्ट झाला आहे. या सगळ्या प्रकाराने काल एकच खळबळ उडाली होती. काल संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हातखंबावरून एक पोलीस कर्मचाऱ्यांने तब्बल आठ गाड्यांना ठोकल्याची घटना घडली होती. हे  पोलीस कर्मचारी नाणीज येथील बंदोबस्त आटपून  आपल्या ताब्यातील गाडी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत असताना  हातखंब्या च्या पुढे कुंवारबावपर्यंत जवळजवळ आठ गाड्या त्यांनी ठोकल्याची घटना घडली आहे. दरम्यान संबंधित पोलीस कर्मचारी हा एक्स मिलिट्री मॅन असून सध्या मुख्यालय येथे कार्यरत आहे. दरम्यान घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली असून काही गाड्या ह्या पर्यटकांच्या होत्या .

त्या रत्नागिरीतून बाहेर पडत असताना हा अपघात झालेले आहेत. संबंधित पोलीस कर्मचारी हा दारू पिऊन गाडी चालवत होता का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून कालच त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे. त्यांच्या मेडिकल टेस्टच्या रिपोर्टवरूनच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते.दरम्यान प्रवासी बाहेरचे असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती मात्र या सगळ्या प्रकारची दखल जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून घेण्यात आली आहे. एकाच वेळी सात ते आठ गाड्यांना ठोकल्याने अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस कर्मचारी सुसाट असल्याने आता नागरिकांनी करायचं तरी काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र या सगळ्यावर आता कुणीही बेजबाबदारपणे वागल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व प्रशासनाने ही कठोर कारवाई करत योग्य तो ईशाराच दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com