Navi Mumbai
Navi Mumbai

Navi Mumbai : नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक; अनेक वाहनांचं नुकसान

नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai) नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नवी मुंबईतील करावे गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रस्त्यावर उभ्या आणि चालू असलेल्या काही वाहनांना जोरदार धडक दिली. अपघात करणाऱ्या इनोव्हा कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वाहन चालक नशेत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर कारची तपासणी केली असता, त्यामध्ये मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत आता पुढील तपास सुरू आहे.

Summary

  • नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक

  • अपघात करणाऱ्या कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असल्याने खळबळ

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक वाहनांचं नुकसान

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com