Pandharpur Wari 2025 : विठ्ठलाचं VIP दर्शन बंद; पदस्पर्श दर्शनाचा कालावधी आला निम्म्यावर

व्हीआयपी दर्शन बंद झाल्याने विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाचा कालावधी निम्म्यावर आला आहे. अवघ्या 6 तासांत देवाचं दर्शन घेऊन भाविक बाहेर पडत आहेत.

ऐन आषाढी यात्रेच्या काळात विठुरायाचं व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आल्याचा फायदा सामान्य भाविकांना होत आहे. दर्शन रांग गोपाळपूर रोडच्या दर्शन मंडपात पोहोचली आहे. 13 दर्शन मंडप खचाखच भरले आहेत. तरी व्हीआयपी दर्शन बंद झाल्याने विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाचा कालावधी निम्म्यावर आला आहे. अवघ्या 6 तासांत देवाचं दर्शन घेऊन भाविक बाहेर पडत आहेत.

दरम्यान, आषाढी एकादशीची शासकीय महापूजा 6 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक करणार आहेत. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य देखील महापूजेला उपस्थित असतील. या शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीने 11 पुजाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा

Pandharpur Wari 2025 : विठ्ठलाचं VIP दर्शन बंद; पदस्पर्श दर्शनाचा कालावधी आला निम्म्यावर
Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, कोणते मुद्दे गाजणार?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com