Bike Taxi : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची राज्यात ई-बाईकला मंजुरी

ई-बाईक टॅक्सीमुळे राज्यात २० हजार तर मुंबईत दहा हजारांहून अधिक रोजगार निर्मितीची शक्यता परिवहन मंत्र्यांनी वर्तवली.
Published by :
Rashmi Mane

राज्यात ई बाईक धोरणाला स्वीकारले जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली बनविण्यात आली असून पावसात भिजू नये म्हणून ई बाईक आणल्या जातील, अशी माहिती यावेळी प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, ई बाईक धोरण राबवताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाहीदेखील परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिली.

बाईक टॅक्सीच्या दरांबाबत अद्याप निश्चित झाली नसून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार अनुदान देण्याचा याद्वारे करणार असल्याचे यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले. ई-बाईक टॅक्सीमुळे राज्यात २० हजार तर मुंबईत दहा हजारांहून अधिक रोजगार निर्मितीची शक्यताही परिवहन मंत्र्यांनी वर्तवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com