Jammu Kashmir earthquake
ताज्या बातम्या
Jammu Kashmir earthquake : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात भूकंप; तीव्रता 4.7 रिश्टर स्केल
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हा भूकंपाने हादरला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jammu Kashmir earthquake) जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हा भूकंपाने हादरला आहे. सोमवारी पहाटे हा भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.
या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती मिळाली नाही. पहाटेच्या वेळी जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात भूकंप
भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल
पहाटेच्या वेळी जमिनीला हादरे
