Indonesia Earthquake
Indonesia EarthquakeTeam Lokshahi

Indonesia Earthquake : इंडोनेशिया भूकंपामुळे हादरले, 162 जणांचा मृत्यू

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे काल भूकंपाच्या धक्क्याने मोठ्या इमारती कोसळल्या.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे काल भूकंपाच्या धक्क्याने मोठ्या इमारती कोसळल्या. आतापर्यंत 162 जणांच्या मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.6 इतकी होती. तर आणखी मृतांचा आकडा वाढू शकतो. ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात लोक दबले गेले आहेत. भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव कर्मचारी आज घटनास्थळी पोहोचले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रांतातील पर्वतीय भागातील सियांजूर शहराजवळ होता. सोमवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले आणि त्यांनी घरे सोडून रस्त्यावर आले. भूकंपामुळे इमारती कोसळल्या. सियांजूर येथील रुग्णालयाची पार्किंग रात्रभर पीडितांनी भरलेली होती. काहींवर तात्पुरत्या तंबूत उपचार करण्यात आले. इतरांना फुटपाथवर टाकण्यात आले. तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांना टाके घातले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com