ताज्या बातम्या
नाशिकमध्ये अनेक भागात जाणवले भूकंप सदृश्य सौम्य धक्के
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के जाणवले आहेत.
थोडक्यात
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के
रात्री 8:35 वाजता भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याची माहिती
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
महेश महाले, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात रात्री 8:35 वाजता भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे.
भूकंपाच्या धक्क्यांची कुठलीही नोंद नसल्याची माहिती मिळत असून स्थानिक तहसील कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला माहिती सादर करण्यात आली आहे.
या भागात अचानक धक्के जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले तर जमिनीखाली सतत होणाऱ्या हालचालीमुळे हे धक्के जाणवत असल्याचं भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटलं असल्याची माहिती मिळत आहे.