बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के; कच्छची जमीन हादरली

बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के; कच्छची जमीन हादरली

गुजरातवर बिपरजॉय वादळाचे संकट घोंगावत आहेत. अशातच, कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नवी दिल्ली : गुजरातवर बिपरजॉय वादळाचे संकट घोंगावत आहेत. बिपरजॉयमुळे गुजरातला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच, कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी गुजरातमधील कच्छमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले.

बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के; कच्छची जमीन हादरली
बच्चू कडू करणार शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलन; सचिवालयात बसणार उपोषणावर

माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती. भूकंपाचे केंद्र नैऋत्येला 5 किमी अंतरावर होते. तर, याआधीही दुपारी 4.15 वाजता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड भागातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 3.4 इतकी होती. आणि मंगळवारी भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव जाणवला.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातसाठी चिंतेचा विषय आहे. बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र रुप घेतले असून आता गुजरातकडे सरकत आहेत. या पार्श्वभूमीवर कच्छमध्ये 4, द्वारका आणि राजकोटमध्ये 3-3, जामनगरमध्ये 2 आणि पोरबंदरमध्ये 1 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमधील पोरबंदर आणि द्वारकाच्या समुद्र किनाऱ्यावरून जाऊ शकते. बिपरजॉयमुळे गुजरातपासून महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com