नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे
Admin

नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे

नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे पडले आहेत.

नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे पडले आहेत. आर संदेश ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे असल्याची माहिती मिळत आहे.

रामदासपेठ येथील घरासह कार्यालयात कारवाई सुरू आहे. कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी ईडीचे पथक पोहचले आहे. रामदेव आग्रवाल यांचे बांधकाम आणि औषध क्षेत्रात काम आहे.

नागपूरच्या कॅनल रोडवरील गौरी हाइट्स, रामदास पेठ परिसरातील रम्मू अग्रवाल यांच्या कार्यालयात कारवाई सुरू आहे..आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक व्यवसाय असून त्याच अनुषंगाने इडी चे पथक कारवाई करत असल्याची माहिती आहे. नागपुरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आर संदेश ग्रुपने गेल्या काही महिन्यात जमिनी खरेदी केल्या आहेत अशी ही चर्चा आहे. ईडी चे पथक आज पहाटेच पोहचले असून सकाळपासून ईडी ची कारवाई सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com