ED Raid : युवराज, उथप्पा, सोनू सूदवर ईडीची मोठी कारवाई..सट्टेबाजी अँप प्रकरणात ईडीकडून मालमत्तांवर जप्ती

ED Raid : युवराज, उथप्पा, सोनू सूदवर ईडीची मोठी कारवाई..सट्टेबाजी अँप प्रकरणात ईडीकडून मालमत्तांवर जप्ती

बेकायदेशीर सट्टेबाजी अँप ‘1xBet’ शी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत अनेक नामवंत व्यक्तींच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप ‘1xBet’ शी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत अनेक नामवंत व्यक्तींच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या कारवाईत माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, अभिनेता सोनू सूद, तसेच तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

७.९३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ईडीने आजच्या कारवाईत एकूण ७.९३ कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत करण्यात आली आहे.

१,००० कोटींहून अधिक व्यवहारांचा संशय

सूत्रांच्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण १,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कथित बेकायदेशीर सट्टेबाजी व्यवहारांशी संबंधित आहे. ‘1xBet’ या ऑनलाइन सट्टेबाजी अॅपच्या जाहिरात आणि प्रचारातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

अनेक सेलिब्रिटींची नावे तपासाच्या रडारवर

या प्रकरणात अभिनेत्री नेहा शर्मा, मॉडेल उर्वशी रौतेलाची आई, तसेच बंगाली अभिनेता अंकुश हजरा यांच्याही मालमत्तांचा समावेश जप्तीत करण्यात आला आहे. यामुळे मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती तपासाच्या रडारवर आल्या आहेत.

याआधीही मोठी जप्ती

या प्रकरणात याआधीही ईडीने कारवाई करत

शिखर धवन यांची ४.५५ कोटी रुपये,

सुरेश रैना यांची ६.६४ कोटी रुपयांची मालमत्ताजप्त केली होती. त्यामुळे हे प्रकरण देशातील सर्वात मोठ्या सट्टेबाजी आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणांपैकी एक मानले जात आहे.

तपास आणखी वेगवान

ईडीकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, जाहिरात करार, बँक खाते व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. पुढील काळात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेकायदेशीर सट्टेबाजीविरोधात केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, या कारवाईमुळे क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com