Lodha Construction
Lodha ConstructionLodha Construction

Lodha Construction : ईडीच्या कारवाईने बांधकाम क्षेत्रात खळबळ; राजेंद्र लोढांवर गंभीर आरोप

लोढा कन्स्ट्रक्शन्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली असून, त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मालकीच्या विविध जागांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

लोढा कन्स्ट्रक्शन्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली असून, त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मालकीच्या विविध जागांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईनंतर बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

स्रोतांच्या माहितीनुसार, कंपनीच्या जमीन व्यवहार, खरेदी आणि टीडीआर विक्री संदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिक फसवणूक आणि अपहार केल्याचा आरोप राजेंद्र लोढा यांच्यावर करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत, कंपनीच्या मालकीच्या जमिनींचे व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार लपवून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्याचा ईडीचा दावा आहे.

याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आधीच कारवाई करत राजेंद्र लोढा यांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगच्या तपासासाठी ईडीने स्वतःचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान अनेक कागदपत्रे, बँक व्यवहार आणि मालमत्तेचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ईडी सध्या या व्यवहारांशी संबंधित सर्व बँक खाते आणि मालमत्ता तपासत आहे.

दरम्यान, लोढा कन्स्ट्रक्शन्सकडून या प्रकरणावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. मात्र, उद्योग वर्तुळात या घटनेनंतर मोठी चर्चा रंगली असून, बांधकाम क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या व्यवहारांवरही तपासाची तलवार लटकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात

  • लोढा कन्स्ट्रक्शन्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली

  • सहकाऱ्यांच्या मालकीच्या विविध जागांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले..

  • कंपनीच्या जमीन व्यवहार, खरेदी आणि टीडीआर विक्री संदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com