Eid-e-Milad: राज्यात बुधावारी ईद-ए-मिलादची सुट्टी! पुण्यात मात्र वेगळा निर्णय

Eid-e-Milad: राज्यात बुधावारी ईद-ए-मिलादची सुट्टी! पुण्यात मात्र वेगळा निर्णय

राज्य शासनाने 10 नोव्हेंबर 2023 च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी पुण्यात सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आलेली होती.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

राज्य शासनाने 10 नोव्हेंबर 20232 च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी पुण्यात सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आलेली होती. ही सुट्टी सोमवार 16 सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

राज्य शासनाने 16 सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी 18 तारखेला करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 तारखेला अनंत चतुर्दशी असल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू, पुण्यामध्ये 16 तारखेलाच ईद-ए-मिलादची सुट्टी असेल.

ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, 18 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Eid-e-Milad: राज्यात बुधावारी ईद-ए-मिलादची सुट्टी! पुण्यात मात्र वेगळा निर्णय
Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com