एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचं सवाल
Admin

एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचं सवाल

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे एकमेकांवर आरोप करणं काही नवीन नाही.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे एकमेकांवर आरोप करणं काही नवीन नाही. याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंवर गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की, आत्महत्या? असा प्रश्न महाजनांनी विचारला. एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांनी आपल्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात नेमकं काय झालं याचा अजूनही तपास पूर्ण झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी बोलताना गिरीश महाजनांना मुलगा नसल्याचा उल्लेख खडसेंनी जाहीररित्या केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाजनांनी आता खडसेंच्या मुलाच्या मृत्यूविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. यावर प्रतिउत्तर देत खडसे म्हणाले की, महाजन यांच्या आरोपांमुळे कुटुंबाच्या भावना दुखावल्या असून खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com