cm eknath shinde
cm eknath shinde

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ताप आणि घशाला इन्फेक्शन, आज दुपारी मुंबईत येणार?

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 105 डिग्री ताप आला आहे. कणकणी असल्याने शुक्रवारी रात्रीपासून घराबाहेर पडले नाहीत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली

  • शिंदेंना ताप आणि घशाला इन्फेक्शन झाल्याची माहिती

  • एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत येणार

  • सध्या एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी साताऱ्यातील दरे गावात

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गाव दरे येथे निवासस्थानी तीन दिवसाच्या मुक्कामासाठी व विश्रांतीसाठी आले आहेत. दरम्यान, गावी आल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे आजारी पडले आहेत. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाला असल्याची माहिती देखील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आहे. घशाला इन्फेकशन आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्याना सलाइन लावण्यात आल्याची माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी दिली. त्याच्यावर चार जणांचे डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे. ते उद्या मुंबईला जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 105 डिग्री ताप आला आहे. कणकणी असल्याने शुक्रवारी रात्रीपासून घराबाहेर पडले नाहीत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com