शिंदे, फडणवीस, ठाकरे दिसणार एकाच व्यासपीठावर; जाणून घ्या कारण

शिंदे, फडणवीस, ठाकरे दिसणार एकाच व्यासपीठावर; जाणून घ्या कारण

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. येत्या 23 तारखेला तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून आरोप, प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. त्यानंतर सर्व एकाच व्यासपीठावर कधी दिसले नाही. मात्र आता शिंदे, फडणवीस, ठाकरे दिसणार एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण अभिनेते अमिताभ बच्चन आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देखील देण्यात आले आहे.

बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण असल्यानं उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com