Nilesh Rane : “फुकटचा आत्मविश्वास आणि उगाचाच इगो… नेमकं कोणाला दाखवायचा? राणेंचा सवाल थेट
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मालवण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सर्व जागांवर विजय मिळवेल, असा ठाम विश्वास आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला. काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी टीका करत असून त्यामागे दुसऱ्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आमची सर्व 20 जागा शिवसेनाच जिंकणार. शहरात फटाके आणि गुलालही आमचेच उडतील,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक हिताला धक्का न लागावा म्हणून महायुतीची चर्चा त्यांनी केली. कार्यकर्त्यांवर अनावश्यक दबाव येऊ नये, यासाठी सतत प्रयत्न केले; मात्र काहींच्या अहंकारामुळे युती शक्य झाली नाही. “मी दोन पराभव पाहिले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये हेच माझं ध्येय,” असे त्यांनी सांगितले.
नारायण राणेंची इच्छा युतीची होती, पण काही जणांच्या हट्टामुळे ती साध्य झाली नाही, असा टोला त्यांनी लगावला.“कार्यात नाही, तर इगोमध्ये अडकलेल्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे,”असे ते म्हणाले.
“ही निवडणूक खासदार नारायण राणेंच्या मानाची आहे. त्यांचा शब्द मी खोटा ठरू देणार नाही,” असं सांगत त्यांनी मालवणचे प्रशासन पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याचे आश्वासन दिले. नगरपालिका हे पवित्र स्थान असून त्यात स्वच्छ प्रतिमेचे लोकच असावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
थोडक्यात
सिंधुदुर्गात युती होण्याची शक्यता आता धूसर..
भाजपा-शिवसेना आमनेसामने पाहायला मिळण्याची शक्यता..
निलेश राणेंच्या उपस्थितीत मालवनमध्ये शक्तीप्रदर्शन..
आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी 3 तारखेला आमचे फटाके पाहावे निलेश राणेंचं वक्तव्य..

