Eknath Shinde : “बाळासाहेब असते तर उलटं टांगून फटके दिले असते” ठाकरे बंधूंवर घणाघात
राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार रंगात आला असून मुंबईतील वरळी येथे महायुतीची मोठी सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भाषणात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत वातावरण तापवले.
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यावर शिंदे यांनी मराठी मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. “मराठी माणसासाठी नेमकं काय केलं?” असा थेट सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे असते तर अशा राजकारणाला कधीच माफी दिली नसती, असेही ते म्हणाले.
मुंबईला अडथळ्यांचं नाही तर प्रगतीचं सरकार हवं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि गैरकारभारातून मुंबईला मुक्त करायचं असून यावेळी महायुतीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, स्वार्थी राजकारणामुळे मराठी माणूस फसवला गेला. भावना नाही तर विकास महत्त्वाचा आहे. मुंबईकर आता जागरूक झाले असून केवळ घोषणा नव्हे, तर काम करणाऱ्यांनाच संधी देतील, असा दावा त्यांनी केला.

